quote

भेट प्रमुखांची

नमस्कार पुणेकर,

आपलं पुणे हे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातचं, पण आता जगातील आयटी क्षेत्राचे-सुद्धा एक प्रमुख केंद्र म्हणूनही ओळखलं जात. इथले नागरिक सुजाण आणि सुशिक्षित असुन त्यांना प्रशासनातील सर्व स्तरावर सक्रियपणे सहभागी होण्यास आवडते. पुणे पोलीस दलाचा प्रमुख हा मी माझा सन्मान समजतो व मी खात्री देऊ इच्छितो कि,आम्ही नि:पक्षपणे, खंबीरपणे, कोणतीही आकसबुद्धी न ठेवता निर्भीडपणे कायद्याची अंमलबजावणी करू, ज्यामुळे आपल्या शहराच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी ते अनुकूल असेल.

गुन्हेगारी रोखणे, गुन्ह्यास प्रतिबंध करणे आणि घडलेल्या गुन्ह्यांचा शोध लावणे हे आमचे ध्येय आहे. ते प्राप्त करण्यासाठी आम्ही आता चार व्यापक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहोत त्यामध्ये पोलिसांची दृष्यमानता वाढविणे, लोकांचा सहभाग वाढविणे व समावेशक पद्धतीने तपास व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, याचा समावेश असेल.

पुणे पोलीस सदैव आपल्या सेवेस उपलब्ध आहेत याची मी आपल्याला खात्री देवू इच्छितो.


अमितेश कुमार आयपीएस, पोलीस आयुक्त, पुणे शहरअमितेश कुमार हे 28+ वर्षांच्या सेवेसह 1995 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत.

विशेष उल्लेख

या विभागात तुम्हाला आमच्या प्रमुख उपक्रमांबद्दल तसेच शौर्य आणि बलिदानाच्या काही प्रेरणादायी कथांबद्दल अधिक माहिती मिळेल जिथे आमचे कर्मचारी त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे गेले.

पुणे पोलिसांकडून नवीनतम

आमचा नागरिकांशी स्पष्ट आणि प्रभावी संप्रेषणावर विश्वास आहे आणि म्हणून ते अखंडपणे करण्यासाठी सोशल मीडिया आणि बातम्यांच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे