You are here Appreciation & Achievement -> ARRESTING GANGSTERS

ARRESTING GANGSTERS


Date of Achievement: 
13.01.2016

प्रॉपर्टी सेल गुन्हे शाखेने येरवडा भागातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक

प्रॉपर्टी सेलमधील पो ना १५१२ खांदारे यांना मिळालेल्या माहिती वरुन मागील ३ ते ४ वर्षा पुर्वी येरवडा भागातील नदीपत्रात पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे - अक्रम खान याचा तो दारू पिऊन चेंबर लाईटचे काठड्यांवर झोपलेला असताना सदर भागातील लाल्या बेसले व त्याचा मित्र शेंड्या कुसाले यांनी डोक्यात दगड घालून खून केलेला आहे अशी बातमी मिलालेने प्रॉपर्टी सेलकडील प्रभारी अधिकारी सौ.सुश्मा चव्हान त्यांच्याकडील स्टाफसह सदर घटनास्थळाचा व संशयित इसमांचे, मयत इसमांचे राहते ठिकाणी व आजूबाजूस गुप्तपणे माहिती काढून त्याची शहानिशा करून मिळाले बातमी व केले गुप्त तपासाचे माहितीही अचूक ठरत असलेने बातमीतील संशयित नामे- १) लाल्या उर्फ बाबा उर्फ नरेंद्रा भगवंत बेसले, वय-२६ वर्षे, धंदा- कार क्लिनिग रा.सं.नं.१५२, पार्नकूटी पायथा नदीपत्रात, ताडीगुट्टा जवळ, येरवडा, पुणे-६, २) सोनू उर्फ शेंड्या उर्फ शिवाजी उत्तम कुसाले, वय- २३ वर्षे, धंदा-पेण्टिंग रा. स. नं.१०, शनि आली,सुरेश लॉड्रीजवळ, येरवडा,पुणे-६ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मयत नामे- अक्रम हुसेन खान हा अन.क्र.१ यांचे मरनाबाबत अधिक चौकशी करता अक्रम खान हा संशयित अ.क्र. १ याची मामी यांचे घरात घुसून अश्लील चाळे करून तिला त्रास देत असलेने त्यांस समजावून सांगूनही तो वारंवार त्रास देऊन त्यांस नेहमी शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत असलेने तो पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो आपला एखादे काटा काढेल असा माझे मानांत विचार आलेने आम्ही दोघांनी मिळून अक्रम खान याचेवर पाळत ठेऊन तो दि.१३/१२/२०१२ रोजी स. १०/३० वा. ते ११/०० वा. चे दरम्यान दारू पिऊन नदीपात्रात चेंबर लाईनचे काठड्यावर झोपले असल्याचा फायदा घेऊन त्याचे डोक्यात दगड घालून त्याचा खून केलेला आहे अशी कबुली दिली. परंतु सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशनला अकस्मात मयत रजि. नं.३९८/२०१२ प्रमाणे दि.१८/१२/२०१२ अन्वये दाखल असलेने त्याबाबत साक्षीदारकडे चौकशी करून वरील निष्पन्न झालेले आरोपी अ. क्र.१) लाल्या उर्फ बाबा उर्फ नरेंद्रा भगवंत बेसले, २) सोनू उर्फ शेंड्या उर्फ शिवाजी उत्तम कुसाले यांनी तिचे मयत नामे- अक्रम हुसेन खान याचा खून केलेला आहे हे निष्पन्न होत असलेने सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशनला मयताचे आईने तक्रार दिलेने येरवडा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं.३७/२०१२ भा.द.वि.क.३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करनेत आलेला असून सदर आरोपीना अटक करून त्याना येरवडा पोलीस स्टेशनला हजर केलेले आहे. दाखल गुन्ह्यांचा पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशन आहे.
सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. सी. एच. वाकडे सो. मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पी. आर. पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१, पुणे शहर वाकसे, सपकाल, पो. हवा. भालचंद्र बोरकर, संजय सुर्वे, संभाजी गायकवाड, सिद्धरांम कोळी, संतोष मोहिते, यशवंत खंडारे, विजय देशमुख, जनार्दन केदार, अविनाश पवार, म. पो. शि. रूपाली चांदगूडे यांनी केली आहे.

CP's Message

Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Safety, Security, Satisfaction (Sss) of Pune Citizens
Read More->

Call in Emergency


Control Room Control Room
26126296, 26122880, 26208250,100
Exchange Exchange
26122202
Crime Alert Crime Alert
26112222
Women Helpline Women/Children Helpline
1091,26050191
Senior Citizen Helpline Senior Citizen Helpline
26111103