You are here Appreciation & Achievement -> कुरियर ऑफिसवरदरोडा टाकनारी टोळी जेरबंद.

कुरियर ऑफिसवरदरोडा टाकनारी टोळी जेरबंद.


Date of Achievement: 
09.02.2016
Photograph: 

कुरियर ऑफिसवरदरोडा टाकनारी टोळी जेरबंद.
श्री.सान्दिप किसन ढेबंरे वय.४१ धंदा. कुरियर रा. मु.पो.शेरेवडि ता. फलटण जि. सातारा व त्यांचे भागीदार श्री.सुजित बोबडे रा. घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा यांचा कुरियारचा व्यवसाय आहे. सदर कुरियर पार्सल मध्ये जनरल पार्सल सोन्या चांदीचे दागिने व्ही पी पी चे पार्सल ने आण करण्यात येते. दि. २/२/२०१६ रोजी रात्रो १२:४५ वाजण्याचे दरम्यान त्यांचे घर नं ३८४ शुक्रवार पेठ पुणे येथील तिरुपती कुरियर ऑफीसमध्ये घुसून कामगारांना बेदम मारहाण करून जबरदस्तीने ऑफीस मधील रोख तीन लाख पन्नास हजार जबरदस्तीने चोरून नेले त्याबाबत खडक पो स्टे पुणे याठिकाणि फिर्याद दिली होती.
मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त श्री. तुषार दोषी व शहर विभाग पुणेचे सहायक पोलीस आयुक्त श्री. प्रवीण कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्यासाठी खडक पो स्टे चे अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
घटनास्थळावरील एकंदरीत परिस्थितीतून ऑफीस मधील कामगारनपैकी कोणाचा तरी यामध्ये नक्की सहभाग असावा असा पोलिसांना दाट संशय आला,त्यामुळे त्यांनी तेथील सर्व कामगारांना चौकशिसाठी ताब्यात घेतले, त्यानुसार तपास चालू केला त्यादरम्यान संशयित आरोपी नामे.विठ्ठल अनिल जाधव वय.२२ रा. मु. पो. जोगवाडी,ता. बारामती, जिल्हा- पुणे याचेबाबत अधिक संशय वाटल्याने त्याचेवर अधिक नजर ठेऊन तपास चालू ठेवले असता त्याने कट रचून जाणूनबुजून दरवाजा उघडा ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने पोलिसांनी मोरगाव व बारामती या ठिकाणी जाउन तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन संशयित आरोपी सचिन जाधव वय.२७ रा.मु.पो. जोगवाडी,ता.बारामती,जिल्हा- पुणे, संभाजी रामदास भोसले वय. ३५ रा. मु. पो. जोगवाडी,ता. बारामती, जिल्हा- पुणे, समीर दादासाहेब चांदगूडे वय. २६, चांदगूडेवस्ती, ता. बारामती. जी. पुणे, किरण राजेंद्र पिसाळ वय. १९ वर्ष. रा. जिजामाता नगर, ता. बारामती, जी. पुणे, यांना ताब्यात घेतले व त्यांनी त्यांचा साथीदार दादु तायप्पा पावार रा. चिखली, इंदापूर, पुणे व बापू मळेकर रा.मु. पो. सोनगाव ता. बारामती, जी. पुणे याचेसह गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यातील रोख रक्कम २८०००.०० रुपये गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार MH-12 CR-9730 असा ६२८०००.०० रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे खडक पो.स्टे. चे अधिकारी व कर्मचारी यांनी योग्या तपास करून गंभीर गुन्हा उघडकीस आणला.
सदर कामगिरी परिमंडल १ पुणे चे पोलीस उप आयुक्त श्री.तुषार दोषी, शहर विभाग पुणे चे सहायक पोलीस आयुक्त श्री. प्रवीण कुलकर्णी यांचे मार्गदर्शना खाली खडक पोलीस स्टेशन पुणे चे व.पो.नि श्री. रघुनाथ जाधव , तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड , अंनत व्यवहारे , व पोलीस कर्मचारी सर्फराज शेख, सुरेश सोनवणे,सुरेश गेगाजे, महेंद्रा पवार, एकनाथ कंधारे, विजय कांबळे, विशाल शिंदे, अमोल पवार, संतोष मते,शिवानंद बोले, कल्पेश बाबर, जाकिर पठान,संतोष पवार, अनिकेत बाबर, दीपक धाबेकर यांनी केलेली आहे.

CP's Message

Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Smt. Rashmi Shukla - Commissioner of Police,Pune
Safety, Security, Satisfaction (Sss) of Pune Citizens
Read More->

Call in Emergency


Control Room Control Room
26126296, 26122880, 26208250,100
Exchange Exchange
26122202
Crime Alert Crime Alert
26112222
Women Helpline Women/Children Helpline
1091,26050191
Senior Citizen Helpline Senior Citizen Helpline
26111103